Ad will apear here
Next
छत्रपती शिवाजी महाराज
महाप्रतापशाली शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय पराक्रमाचे विस्तृत वर्णन कृ. अ. केळुसकर यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या चरित्रलेखनातून केले आहे. या चरित्राची पहिली आवृत्ती १९०६मध्ये प्रसिद्ध झालेली आहे. याची नववी आवृत्ती वाचकांसाठी सध्या उपलब्ध आहे.

शिवाजी महाराज यांच्या कुळापासून सुरुवात होत त्यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांची ओळख, त्यांचे पुत्र व शिवरायांचे वडील शहाजीराजे यांचा पराक्रम, शिवाजी महाराजांचे बालपण, त्यांचे शिक्षण, महाराजांनी केलेली स्वराज्य स्थापनेची सिद्धता व आरंभ आदी प्रकरणांमधून शिवरायांची स्वराज्ये स्वप्नपूर्तीकडे सुरू झालेली वाटचाल समजते. पुढे स्वसत्तावृद्धी करताना त्यांच्या मोहिमांचा वृत्तांत दिला आहे.

शिवरायांचे मोगलांशी संबंध स्पष्ट करताना विजापूरकरांचा मुलुख काबीज करणे, अफझल खानाचा वध, मोगलांच्या राज्यातील स्वाऱ्या, सुरत व अन्य शहरांची लूट, मिर्झाराजे जयसिंग यांची स्वारी, आग्रा भेटीत व सुटका, स्वदेशी परतल्यावर केलेला पराक्रम, राज्याभिषेकाने स्वराज्यस्थापनेची पूर्ती व राज्यव्यवस्था, महाराजांचा अंतकाळ येथपर्यंतचे शिवचरित्र यात वाचायला मिळते.

पुस्तक : छत्रपती शिवाजी महाराज
लेखक : कृष्णराव अर्जुन केळूसकर
प्रकाशक : वरदा प्रकाशन
पाने : ६६४
किंमत : ४५० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZOYBX
Similar Posts
सम्राट अशोक चरित्र सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी भारतात आपले आधिपत्य निर्माण करून इतिहास अजरामर झालेला सम्राट अशोक हा राजा होऊन गेला. त्याने फक्त राज्यच केले असे नाही, तर त्याने जनतेला धर्मज्ञान, सदाचार, भूतदया या गुणांची शिकवण दिली. प्रजेने या तत्त्वांवर चालावे अशी आशा त्याने केली आणि तसा प्रयत्न आयुष्भर केला.
डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र व पत्रे ब्रिटिशकाळात परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या आनंदीबाई जोशी या पहिल्या महिला भारतीय डॉक्टर ठरल्या; मात्र ही भरारी घेण्यासाठी त्यांनी त्या काळी किती कष्ट घेतले, अवहेलना, त्रास भोगला हे काशिबाई कानिटकर यांनी लिहिलेल्या ‘डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र व पत्रे’ या चरित्रातून समजते.
माँसाहेब जिजाऊ पराक्रमी, लढवय्या, रयतेची काळजी घेणाऱ्या शिवबांची जडणघडण झाली ती त्यांची आई जिजाऊंच्या सान्निध्यात. आदिलशाहने शहाजीराजे यांची रवानगी बंगळूरला केल्यानंतर पुण्यातील जहागिरी सांभाळण्याची व लहानग्या शिवबाला घडविण्याची जबाबदारी जिजाबाईंवर आली. त्यांनी प्रथम लाल महाल बांधला. कसब्याला पांढरीवर शिवरायांच्या
मराठे व इंग्रज पेशव्यांचे राज्य बुडाले, त्याला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी ‘मराठेशाहीचे शतसावंत्सरिक श्राद्ध’ असे पुस्तक लिहिले, तेच हे पुस्तक. पूर्वरंग आणि उत्तरांग असे पुस्तकांचे दोन भाग आहेत. पूर्वार्धात इंग्रजांपूर्वीचा महाराष्ट्र, इंग्रज हिंदुस्थानात का व कसे आले, या प्रश्नांचा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language